चंदगड तालुक्यातील ३७ ग्रामपचायतीसाठी ११३ मतदान केंद्रांवर आज मतदान, ५६५ कर्मचारी तैनात - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2022

चंदगड तालुक्यातील ३७ ग्रामपचायतीसाठी ११३ मतदान केंद्रांवर आज मतदान, ५६५ कर्मचारी तैनात

 

मतदान केंद्रावर बसमधून साहित्य नेण्यात आले.

चंदगड/प्रतिनिधी (नंदकुमार ढेरे)
चंदगड तालुक्यातील ४०पैकी ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्या, रविवारी (दि १८) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन सज्ज झाले असून आज, शनिवारी सकाळपासून चंदगड तहसील कार्यालयात सर्व मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांसह साहित्य पोहोचवण्याची लगबग  दिसून आली.दुपारी २ वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी पोहोचलेची माहिती तहसीलदार विनोद रणवरे यांनी दिली.
चंदगड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पैकी ३ पुर्णता व ३ अंशता ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रशासनावरचा काही प्रमाणात ताण कमी होण्यास मदत झाली. मात्र प्रत्यक्षात ३७ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे.
आज सकाळी १० वाजल्यापासूनच चंदगड तहसील कार्यालयातून ३७ ग्रामपंचायतीच्या १११ प्रभागासाठी ११३ मतदान केंद्रांवर सर्व साहित्यासह ५६५ कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. निवडणुका असणाऱ्या गाव व मतदान केंद्रांनिहाय साहित्य व कर्मचाऱ्यांना एस टी तून पाठवण्यात आले.
     निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी तहसीलदार विनोद रणवरे,निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत, निवडणूक नायब तहसीलदार सचीन आखाडे, अव्वल कारकून प्रकाश जाधव, महसुल सहाय्यक अमर साळोखे, नेहाल मुल्ला यांच्यासह निवडणूक विभागातील यांच्यासह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.



No comments:

Post a Comment