श्रमदानातून निर्माण केला कोलिक येथे वनराई बंधारा - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2022

श्रमदानातून निर्माण केला कोलिक येथे वनराई बंधारा

कोलिक येथे श्रमदानातून निर्माण केलेला वनराई बंधारा

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

        नियतक्षेत्र कोलिक मध्ये वनविभाग पाटणे व वन परिमंडळ तुडिये मधील कोलिक गावातील ग्रामस्थ वनकर्मचारी यांच्या संयुक्त श्रमदानातून निर्माण केला. वनराई बंधारा डिसेंबर ते जून अखेर जंगल क्षेत्रामधील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील वन्यप्राणी पशुपक्षी हे पाण्यासाठी वन-वन भटकतात व पाणी मिळेल. अशा ठिकाणी आपला प्रवास करतात. याच कारणाने मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. याच अनुषंगाने ओढ्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात वाहत्या पाण्याची पातळी असते.

          त्या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी वनराई बंधाऱ्याचे  निर्माण केले जाते. जेणेकरून त्या ठिकाणी वन्य प्राण्यांना पिण्यायोग्य पाणी मिळेल व पक्षांना त्याचा उन्हाळ्यातही भटकंती करावी लागू नये. या प्रकारचे उद्दिष्टे समोर ठेवून लोकांच्या सहभागातून हा वनराई बंधारा बांधला आहे. सदर बंधारा प्रशांत आवळे (वनक्षेत्रपाल पाटणे), नेताजी धामणकर (वनपाल तुडिये) यांचे मार्गदर्शनाखाली एस. बी. तांबेकर, एम. आय. सनदी, पी. एम. शिंदे, एस. एस. बोंद्रे, मोनापा मुतगेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment