मतदानासाठी लागलेली मतदारांची रांग |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीसाठी आज चुरशीने ८२.८० टक्के मतदान झाले. या ग्रामपंचायतीसाठी ४९४८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २०१९५ पुरुष तर २१०७२ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान मतदान झाले.
निट्टूर येथील अमित आनंदा पाटील यांनी मुंडावळ्यासह लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. |
गावनिहाय मतदान गाव व मतदानाची टक्केवारी : अडकूर ८२.३३, अलबादेवी ८१.३४, आसगोळी ७६.२७, इनाम म्हाळुंगे व काजिर्णे ९४.२१, कडलगे बुद्रुक, ८४.०४, करंजगाव ७९.८६, कागणी ८०.९२, कुदनुर ८४.७७, केंचेवाडी ८३.८३, कोकरे-अडुरे ८४.३३, कोनेवाडी ८९.४३, कोरज-कुर्तनवाडी-गंधर्वगड ८१.२२, कोलिक ८६.००, खालसा कोळींद्रे ७७.१९, गवसे ८३.०८, गुडवळे खालसा ८६.५७, जंगमहट्टी ८७.६२, जेलुगडे ८६.०२, डुक्करवाडी ६८.९३, ढेकोळी ८८.६८, तडशिनहाळ ९१.९१, तेऊरवाडी ७३.३०, दुंडगे ८७.१०, नागरदळे ७५.०९, निट्टूर ७३.५१, पार्ले ८८.८७, महिपाळगड ८३.२६, मोटणवाडी ७३.८२, म्हांळुगे खालसा ८९.५७, राजगोळी खुर्द ८३.१६, विंझणे ८५.५९, शिनोळी बुद्रुक ९०.५३, शिरगाव ७८.८३, सरोळी ९३.८३, हल्लारवाडी ८९.५१, हिंडगाव-फाटवाडी ९२.६४, हेरे ८२.७५.
चंदगड तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीमधील इनाम म्हाळुंगे व काजिर्णे ९४.२१ या ग्रुप ग्रामपंचायतीसाठी चुरशीने सर्वांधिक मतदान झाले. तर डुक्करवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वांत कमी ६८.९३ टक्के मतदान झाले.अडकूर केंद्रावर पोलिसांची अरेरावी....
अडकूर (ता. चंदगड) येथील केंद्र क्रमांक ४ वर दै. नवराष्ट्रचे चंदगड तालुका प्रतिनिधी विजयकुमार कांबळे हे वार्ताकंनासाठी गेले होते. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगेच्या फोटो काढताना त्यांना मज्जाव केला. तसेच प्रेसचे आयकार्ड दाखविल्यानंतर ते भिरकाऊन देवून पी. एस. आय. सतपाल कांबळे यांनी अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत प्रतिनिधी विजयकुमार कांबळे हे जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार देणार आहेत.
अडकूर येथील मतदान केंद्र क्रमांक २ वर जाॅन्सन गाॅदड हे आज दुपारी बाराच्या दरम्यान विवाहबध्द झाले. त्यानंतर त्यांनी नवरदेवाच्या वेषातच थेट मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला. यावेळीही पोलिसांनी अरेरावी केली.
त्याचबरोबर निट्टूर येथील अमित आनंदा पाटील यांचा कुडाळ येथे साडेबारा वाजता विवाह होता. तत्पुर्वी सकाळी नवरदेव अमित याने सव्वासात वाजताच मतदानाचे कर्तव्य पार पाडत चतुर्भुज होण्यासाठी कुडाळला रवाना झाले.
No comments:
Post a Comment