चंदगड तालुकास्तरीय शालेय सांस्कृतिक स्पर्धांना मंगळवारपासून प्रारंभ - गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2022

चंदगड तालुकास्तरीय शालेय सांस्कृतिक स्पर्धांना मंगळवारपासून प्रारंभ - गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांची माहिती

चंदगड पंचायत समिती

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती चंदगड यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या वार्षिक तालुकास्तरीय शालेय सांस्कृतिक स्पर्धा मंगळवार दि. २० ते गुरुवार २२  डिसेंबर अखेर कुमार व कन्या विद्या मंदिर चंदगड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार यांनी दिली.

        २० रोजी वरिष्ठ गट समूहगीत व समूह नृत्य, कनिष्ठ गट कथाकथन व नाट्यीकरण. २१ रोजी कनिष्ठ गट समूहगीत व समूहनृत्य, वरिष्ठ गट कथाकथन व नाट्यीकरण. २२ रोजी कनिष्ठ गट व वरिष्ठ गट प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, चंदगड नगरपंचायत मुख्याधिकारी स्वरूप खारगे, नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, शिक्षण सभापती अनुसया दाणी, ॲड. जितेंद्र मुळीक, कमलाकर सावंत, रफिक पटेल, बाबुराव परीट, विजय कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्रप्रमुख तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जी. बी. जगताप, संयोजक श्रीकांत सावंत, मुबारक लाटकर आदींनी केले आहे.
No comments:

Post a Comment