चंदगड येथील फादर अग्नेल स्कुलचा गुरुवारी 'वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन' कार्यक्रम - प्राचार्य फादर विल्सन पॉल यांची माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2022

चंदगड येथील फादर अग्नेल स्कुलचा गुरुवारी 'वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन' कार्यक्रम - प्राचार्य फादर विल्सन पॉल यांची माहिती

चंदगड येथील फादर अग्नेल स्कुलची इमारत.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील इंग्लिश माध्यमाच्या फादर अग्नेल स्कुलचा विविध गुणदर्शन व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम गुरुवार २२ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजून ३० मिनिटांनी आयोजित केल्याची माहीती प्राचार्य फादर विल्सन पॉल यांनी दिली. 

     यानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक अभ्यासक, विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे मार्गदर्शन होणार  आहे. त्याचबरोबर चंदगड पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा देण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन स्कुलच्या वतीने केले आहे. 

        कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांच्या स्वागताने होईल. त्यानंतर बॅन्ड, विद्यार्थी परिषद सदस्य, प्रार्थना नृत्य, भरतनाट्यम नृत्य, दिवा लावणे, पाहुण्यांचे स्वागत भाषण आणि सत्कार, शाळेचा अहवाल, सांस्कृतिक कार्यक्रम, पाहुण्यांची भाषणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आभार, सांस्कृतिक कार्यक्रम चालू व शालेय गीत गायनाच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होईल. 
No comments:

Post a Comment