हलकर्णी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचे तावरेवाडी येथे स्नेहसंमेलन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2022

हलकर्णी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचे तावरेवाडी येथे स्नेहसंमेलन उत्साहात

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        हलकर्णी (ता. चंदगड) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील महाविद्यालयाच्या एनएसएसच्या श्रमसंस्कार शिबिरार्थीचे तावरेवाडी येथे सांस्कृतिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

      स्वयंसेवक, शिबिरार्थीनी १३ ते१९ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये ग्रामस्वच्छता, प्रबोधनपर कार्यक्रम, पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत वसुंधरा बंधारे, मतदान जनजागृती रॅली, लहान मुलं मुलांची आरोग्याची काळजी, व्यसनमुक्तीपर पथनाट्य, आर्थिक सर्वेक्षण, स्मशानभूमी स्वच्छता याबरोबरच मनोरंजनात्मक भरगच्च कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये सुधा कागनकर व नयन ओऊळकर यांची लावणी करुणा तान गावडे यांचे शेतकरी गीत, शेतकरी नवरा हवा हे नाटके सादरीकरण कुमारी माधुरी सुतार ,देशभक्तीपर गीत कुमार इंद्रायणी पाटील, त्याचबरोबर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. 

          या कार्यक्रमाचे खास आकर्षण तावरेवाडी मराठी विद्या मंदिराची कलाकार कुमारी काव्या केशव पाटील याचे नृत्य खास आकर्षण ठरले. मिमिक्री, नकला इत्यादी कार्यक्रमांचे सादरीकरण सर्व कलाकारांनी केले,त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश फर्निचरचे मालक रामा विष्णू कागणकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ पाटील होते. यावेळी पोलीस पाटील काशिनाथ कागनकर, संदीप सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते. 

          यावेळी या गावचे दैनिक पुण्यनगरीचे वार्ताहर विलास कागनकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार मिळाल्याबद्दल एनएसएसचे प्रकल्प अधिकारी प्रा. यु. एस. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थिताचे स्वागत प्रा. शाहू गावडे, प्रा.अंकुश नौकुडकर, डॉ. जे. जे. व्हटकर, सौ. वंदना केळकर, राजू बागडी, दिलीप पाटील, एनएसएस प्रतिनिधी महेश सांबरेकर यांनी केले.  प्रा. जी. जे. गावडे यांनी सुत्रसंचालन केले. आभार प्रा. शाहू गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment