तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हा स्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये (ओपन साईड एअर रायफल) या खेळ प्रकारात १७ वयोगट मुली या गटामध्ये न. भु. पाटील जूनियर कॉलेज चंदगडची विद्यार्थिनी अदिती नितीन हदगन इयत्ता ११ वी ' विज्ञान, हिने जिल्हास्तरीय स्पर्धेत ३२९ गुणांनी प्रथम क्रमांक पटकावला.
त्यामुळे तिची डेरवण (रत्नागिरी) येथे होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धे साठी निवड झाली आहे. तीला प्राचार्य एन. डी. देवळे यांचे प्रोत्साहन लाभले व क्रीडाशिक्षक व्ही. टी. पाटील, एन. डी. हदगल व युवराज चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment