कोवाड येथे २१ डिसेंबर रोजी मोफत डोळे तपासणी शिबिर, लोकमान्य पतसंस्थेचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2022

कोवाड येथे २१ डिसेंबर रोजी मोफत डोळे तपासणी शिबिर, लोकमान्य पतसंस्थेचा उपक्रम


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कोवाड (ता. चंदगड) येथे लोकमान्य पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे कोवाड शाखाधिकारी गोविंद दंडगे यांनी दिली.

       लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा आपला अकरावा वर्धापन दिन साजरा करत आहे. या काळात संस्थेने कोवाड  परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेमार्फत  आरोग्य विमा, अपघाती विमा, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे या नित्याच्या व्यवहाराबरोबरच परिसरातील शिक्षण, आरोग्य सेवा, कला, पर्यटन क्षेत्रातील सामाजिक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित डोळे तपासणी शिबिराचा परिसरातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. संस्थेच्या कोवाड शाखेत नंदादीप नेत्रालय बेळगाव येथील तज्ञ डॉक्टर मोफत तपासणी करून औषध उपचार करणार आहेत.

        वर्धापन दिन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत दीक्षित, कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाचे व्यवस्थापक दिलीप पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी वर्धापन दिन कार्यक्रम व नेत्र शिबिरास हितचिंतक व गरजू रुग्णांनी उपस्थित रहावे. गरजू रुग्णांनी मोबाईल क्रमांक 7722052084 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन शाखा मॅनेजर दंडगे यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment