मजरे कारवेच्या आनंद सुतारने पटकावले सोलापूर विद्यापीठाचे सुवर्ण पदक - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2022

मजरे कारवेच्या आनंद सुतारने पटकावले सोलापूर विद्यापीठाचे सुवर्ण पदक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            मजरे कारवे (ता. चंदगड) येथील रहिवाशी आनंद दत्तात्रय सुतार याने सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विश्वविद्यालयाचे शिक्षणशास्त्र (बी. पी. एड) विभागासाठीचे दलित मित्र चंद्राम रामचंद्र चव्हाण सुवर्णपदक पटकावले. सोलापूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात श्री. सुतार यांना हे सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते  देण्यात आले.

         सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठांतर्गत येणार्‍या श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्याालयात बी. पी. एड. या विभागात आनंद सुतार यांनी सन २०२१- २२ या परीक्षेत प्रविण्यासह प्रथम क्रमांक मिळवला.

        विद्यापीठात बी. पी. एड. अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या प्रशिक्षणार्थीस  सुभाष चंद्राम चव्हाण याच्या वतीने "दलित मित्र चंद्राम रामचंद्र चव्हाण सुवर्णपदक देण्यात येते.यावर्षी हे सुवर्णपदक बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील आनंद दत्तात्रय सुतार यानी संपादन केले आहे. महाविद्यालयात समृद्ध मानवी व भौतिक सुविधा आहेत. यात तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शक, प्रयोगशाळा, क्रीडांगणे, जलतरण तलाव, इनडोअर स्टेडियम, मुलींचे वसतिगृह आदी सुविधाचा समावेश आहे.

      महाविद्यालयात उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत आनंद सुतार यांनी हे यश संपादन केले आहे.या पदवीप्रदान समारंभात १७ हजार पदवीधारकांना पदवी प्रदानपत्र देण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे,बी.पी. एड. विभाग प्रमुख डॉ. ए. जी. कांबळे, एम. पी. एड. विभाग प्रमुख डॉ.सुरेश लांडगे,प्रा. एस. एस. सुरवसे, प्रा. पी. पी. नरळे, प्रा. एस. एस. मारकड, प्रा. एस. ए. सावळे, प्रा. एच. के. बारसकर, प्रा.आर. एस. डिसले व पालक दत्तात्रय सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment