मराठी अध्यापक संघामार्फत निबंध व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन, कधी आहे स्पर्धा.......... - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2022

मराठी अध्यापक संघामार्फत निबंध व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन, कधी आहे स्पर्धा..........

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत तालुकास्तरीय निबंध व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन शनिवार २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वा. प्रमुख केंद्रावर करण्यात आले आहे. प्राथमिक व माध्यमिक या दोन गटात  स्पर्धा होणार आहेत.

निबंध स्पर्धेला लहानगटासाठी माझे आवडते कार्टून, मला आदृश्य होता आल तर.., मराठी भाषा माझी आई, मामाच्या गावाला जाऊया, शामची आई- एक संस्कार दीप

तर मोठा गटासाठी

वाढत्या बेरोजगारीचा भस्मासुर, कोरोनाने आम्हाला काय शिकवले, हद्दपार होताहेत आजी आजोबा, पर्यावरण पुरक सण व आपली संस्कृती, अन्नदाता सुखी भवः 

       हे विषय आहेत. या स्पर्धा चंदगड, हेरे, नागनवाडी, अडकूर, कार्वे, डूकरवाडी, माणगाव, कालकुंद्री, निट्रूर, तूडये या माध्यमिक शाळांमध्ये होणार आहेत. या स्पर्धामध्ये सहभागी होण्याचे आवाहन अध्यापक संघाचे अध्यक्ष रवि पाटील यांनी केले आहे.No comments:

Post a Comment