![]() |
चंदगड तालुका संगणक परिचालकांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना संगणक परिचालक. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
संगणक परिचालक संघटनेच्या वतीने नागपूर येथे हिवाळी अधिवेशन काळात सोमवार २६ डिसेंबर २०२२ रोजी विविध मागण्यासाठी नागपूर येथे संघटनेच्या वतीने आंदोलन करणार आहे. या काळात चंदगड तालुक्यातील संगणक परिचालक कामावर उपस्थित राहणार नसल्याने या काळात कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन चंदगड तालुका संगणक परिचालकांच्या वतीने चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळण्यासाठी वेगगवेळ्या माध्यमातून लढा सुरू आहे. शासनाने अनेक वेळा लेखी आश्वासन दिले असताना सुद्धा प्रश्न मार्गी लागताना दिसत नाही. अनेकवेळा ग्रामविकासमंत्र्याची भेट घेतली. परंतु ग्रामविकास विभागातून आपली आकृतीबंधाची फाईल काही हलताना दिसत नाही. आंदोलन केले तर किमान आपला प्रश्न या नवीन शासनाच्या लक्षात येईल व थांबलेली प्रक्रिया पुढे जाऊन आपला प्रश्न निकाली निघू शकतो. त्यामुळे सर्वानुमते नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment