![]() |
आदिती हदगलची |
विभागीय क्रीडा संकुल डेरवन (रत्नागिरी) येथे झालेल्या विभागीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेमध्ये (ओपन साईड एअर रायफल) या खेळ प्रकारात १७ वर्षीय मुलीच्या गटामध्ये न. भु. पाटील जूनियर कॉलेजची विद्यार्थिनी अदिती नितीन हदगल (इयत्ता११वी विज्ञान शाखा) हिने विभागीय स्पर्धेत सिल्वर मेडल मिळविले.
तिची पनवेल (रायगड) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदितीला क्रीडाशिक्षक व्ही. टी. पाटील, एन. डी. हदगल, टी. व्ही. खंदाळे व युवराज चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य एन. डी. देवळे यांनी तिचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment