मगरीच्या हल्ल्यात दत्तवाड येथील केडीसीसी बँकेचा निवृत्त कर्मचारी ठार - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2025

मगरीच्या हल्ल्यात दत्तवाड येथील केडीसीसी बँकेचा निवृत्त कर्मचारी ठार

  


कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा

         दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीच्या पात्रात अंघोळीला गेलेल्या केडीसीसी बँकेचे निवृत्त कर्मचारी लक्ष्मण कलगी (वय-६५) यांच्यावर मगरीने हल्ला करत नदीपत्रात ओढून नेऊन ठार केले. सदर घटना सोमवारी (दि. १) डिसेंबर रोजी घडली. लक्ष्मण हे त्यांच्या मित्रांसोबत दूधगंगा नदीत गेले होते. सर्वजण आंघोळ करून नदी बाहेर आले होते. मात्र लक्ष्मण हे टॉवेल घेण्यासाठी नदीकाठावर गेले. याच वेळी पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने त्यांच्या पायाला चावा घेऊन ओढत पाण्यात नेले. खोल पाण्यात घेऊन गेल्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. नागरिकांनी त्यांना मदत करून नदीतून बाहेर काढले मात्र त्यावेळी ते जखमी अवस्थेत बेशुद्ध होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

No comments:

Post a Comment