भोगावती साखर कारखान्यातर्फे ३६५३ दर बँकेत जमा, राज्यात उच्चांकी दर - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2025

भोगावती साखर कारखान्यातर्फे ३६५३ दर बँकेत जमा, राज्यात उच्चांकी दर

 

कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा

      शाहुनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यांने यंदाच्या उसाला ३,६५३ रुपये प्रति टन असा दर दिला. पहिल्या २० दिवसातील बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. मागील वीस दिवसात या साखर कारखान्याचा उतारा १०.३६% आहे. या कारखान्याचा हा दर राज्यात सर्वाधिक असल्याचा दावा केला आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

No comments:

Post a Comment