चंदगड येथील सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने गावडे यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2022

चंदगड येथील सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने गावडे यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात

सौ. गावडे यांना आर्थिक मदतीचा धनादेश देताना पतसंस्थेचे पदाधिकारी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       चंदगड येथील सैनिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सौ. अंजली धनाजी गावडे (खा. कोळींद्रे, सध्या राहणार चंदगड गडकरी वसाहत) यांचे पती धनाजी गावडे हे सातारा येथे हातमागावर चादर फॅक्टरीमध्ये कामाला होते. त्यांना घशाचा कॅन्सर झाल्याने त्यांच्या कुंटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.          

        त्याना दोन लहान मुले असल्याने त्यांचा शिक्षणाचा व धनाजी गावडे यांना औषधोपचाराचा खर्च न परवडणारा असल्याने आम्ही सैनिक पतसंस्था चंदगड च्या वतीने ५०००/-रू आर्थिक मदत संस्था चेअरमन अंकुश गवस यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक सुभाष गवळी, अनिल शेलार, धोंडीबा चौकुळकर, अजित गावडे, अरुण गावडे, मनोज लोहार व मदत घेणारे सौ. अंजली गावडे उपस्थीत होत्या.

No comments:

Post a Comment