कानुर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गीता खांडेकर यांचा शनिवारी सेवानिवृत्तीबद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2022

कानुर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गीता खांडेकर यांचा शनिवारी सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

 

गीता खांडेकर 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         केंद्रिय प्राथमिक शाळा कानुर खुर्द (ता. चंदगड) च्या  मुख्याध्यापिका श्रीमती गीता धोंडीराम खांडेकर ह्या ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून ३१ डिसेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शनिवार  २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कानुर खुर्द येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सरपंच निवृत्ती महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात श्रीमती गीता खांडेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 

    यावेळी आमदार राजेश नरसिंगराव पाटील याच्यासह भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील, काँग्रेस राज्य कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार, माजी सभापती संग्रामसिंह कुप्पेकर, माजी सभापती ॲड. अनंत कांबळे, शिक्षकनेते शंकर मनवाडकर, माजी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, माजी जि. प. सदस्या सौ. विद्या  पाटील, माजी सभापती शांताराम बापू पाटील, चंदगड अर्बनचे अध्यक्ष दयानंद काणेकर, माजी उप सभापती सौ. मनिषा शिवनगेकर, बाळू प्रधान  केंद्र प्रमुख कार्वे, तानाजी गडकरी (संचालक तालुका संघ), अॅड. संतोष मळवीकर, माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, माजी शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, प्रविण वाटंगी (अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना)  गोपाळ गंगाराम वाके (माजी उपसरपंच शिरगांव) गोपाळ विठ्ठल जगताप (केंद्रप्रमुख), शाम बाबूराव कोरगांवकर (संचालक ज्यो. प. सं.चंदगड) फिरोज मुल्ला (उपनगराध्यक्ष चंदगड), बाबुराव परिट (शिक्षक बँक संचालक), सौ. पुनम तुकाराम फाटक (सरपंच ग्रा. पं. हिंडगांव) विनायक धोंडीबा खांडेकर (उपसरपंच हिंडगांव) चंद्रकांत तुकाराम फाटक (चेअरमन सेवा सोसा. हिंडगांव) सटुप्पा रामू म्हसकर (व्हा. चेअरमन सेवा सोसा. हिंडगांव) सचिन मष्णू दळवी (तंटामुक्त अध्यक्ष हिंडगांव) विल्सन फिलीप रॉड्रीक्स (सामाजिक कार्यकर्ते) श्रीमती शांता शामराव कांबळे (बेळगांव) साताप्पा भिमाप्पा तलवार (एस. आय. बेळगांव) किशोर मोहन राठोड (बेळगांव) सुरज ललित खत्री (पुणे) सुधाकर पाटील (मनसे सरचिटणीस), परशराम मळवीकर यासह शिक्षक समिती, संघाचे सदस्य,  शैक्षणिक, राजकिय क्षेत्रातील मान्यवर  या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी  या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन प्रभारी मुख्याध्यापक अनंत मोटर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment