वनपाल दत्तात्रय पाटील महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णपदकाने सन्मानित,नागपूर येथे वनमंत्री मानगुंटीवर यांच्याहस्ते सुवर्णपदकाचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2022

वनपाल दत्तात्रय पाटील महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णपदकाने सन्मानित,नागपूर येथे वनमंत्री मानगुंटीवर यांच्याहस्ते सुवर्णपदकाचे वितरण

नागपुर येथे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र स्विकारताना वनपाल दत्ता पाटील

चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन वनविभागाकडून उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारे सुवर्णपदक पाटणे (ता. चंदगड) येथील दत्तात्रय हरी पाटील याना नागपूर येथे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते  सुवर्णपदक बहाल करून प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी दत्तात्रय पाटील यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची चित्रफीत दाखवण्यात आली. श्री पाटील यांना २०२२ ऑक्टोबर मध्ये नॅशनल रुरल डेव्हलपमेंट कौन्सिलचा आंतरराज्य आदर्श अधिकारी पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
 पाटील यांना यापूर्वी जैवविविधता पोवाडा रचने व त्यामध्ये शहराची प्रमुख भूमिका साकारल्याबद्दल सन २०१९ मध्ये वनमंत्री यांनी करण्यात सन्मानित केले आहे.
यापूर्वी श्री. पाटील यांना विविध स्तरावरून शासनाकडून तसेच स्वायत्त संस्थांकडून वेळोवेळी पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे. यापूर्वी श्री. पाटील यांना विविध स्तरावरून शासनाकडून तसेच स्वायत्त संस्थांकडून वेळोवेळी पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे.
वने व पर्यावरण विषयक त्यांनी लेखन व कविता केल्या आहेत. तसेच शाळा महाविद्यालय व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी वन व पर्यावरण विषयक तसेच मानव वन्य जीव संघर्ष विषयक वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. श्री. पाटील यांनी भजन किर्तन कथा भारुड तमाशा इत्यादी सामाजिक कलांमधून आपला कलेचा वारसा जपणे सोबतच ग्रामस्वच्छता व्यसनमुक्ती इत्यादी  बाबत उपदेश व मार्गदर्शन केले आहे. तरुणांसाठी नोकरी विषयक मार्गदर्शन करण्यास ते नेहमी अग्रेसर असतात.

      वनपाल पाटील यांना सन २०१८/१९ चा वने व वन्यजीव व्यवस्थापनाचे वनपाल संवर्गातून सुवर्णपदक जाहीर झाल्याचा शासन निर्णय झाला होता. मात्र कोरोनाच्या काळामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला नव्हता. 
यावेळी व्यासपीठावर मंत्री, आजी-माजी आमदार खासदार उपस्थित होते. राज्याचे प्रधान वन सचिव  व वनबल प्रमुख व विविध वरिष्ठ वनाधिकारी, व विविध क्षेत्रातील मान्यवरासह त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. आपल्याला मिळालेले सुवर्णपदक हे वने व वन्यजीव संरक्षण व संवर्धनात अहोरात्र झटणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे असल्याचे सांगून आपल्या आयुष्यातील खऱ्या यशाचे मानकरी आपले आई वडील, कुटुंबीय व मित्रमंडळ असल्याचे पाटील यांनी सांगितले. दत्ता पाटील घाटकरवाडी (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील असून कोल्हापूर जिल्हा वन खाते कर्मचारी पतसंस्था कोल्हापूरचे विद्यमान अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य वन संघटना कोल्हापूरचे ते माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरावर कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment