फातरफेकर कुटुंबियांनी केली कोवाड महाविद्यालयाच्या संगणक लॅबला आर्थिक मदत, एकाच वेळी ४० विद्यार्थ्यांची सोय - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2022

फातरफेकर कुटुंबियांनी केली कोवाड महाविद्यालयाच्या संगणक लॅबला आर्थिक मदत, एकाच वेळी ४० विद्यार्थ्यांची सोय

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

   कोवाड (ता. चंदगड) येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित,कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील् सायन्स विभागातील संगणक प्रयोगशाळेसाठी मुंबई येथील जी. एम. मेडिकल आणि के. ई. एम हॉस्पिटलच्या प्रा. सौ. गीता फातरफेकर सेठ व ड्रेसर रयन्ड अँड सिमेन्स कंपनीचे विजय फातरफेकर(एम डी.) या दाम्पत्यांच्या आर्थिक मदतीतून तयार झालेल्या अद्ययावत संगणक लॅबचे उद्घाटन सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले.

    एकाच वेळी ४० विध्यार्थांची प्रात्यक्षिकासाठीची प्रशस्त बैठक व्यवस्था  फर्निचरचा वापर करून सुंदर   पद्धतीनी  लॅब तयार  केली आहे. विधार्थांना प्रात्यक्षिक करताना अडचण होऊ नये प्रात्यक्षिक सुकर व्हावे  म्हणून    देणगीच्या माध्यमातून   समस्या दूर केली आहे. त्यासाठी फातर्फेकर या कुटूंबियांचे  देणगीच्या रूपातून खूप मोठे योगदान लाभले आहे.  देणगीसाठी  प्राचार्यां  डॉ. एम.एस.पवार यांचे सहकार्य मिळाले. या देणगीतून  चाळीस नवीन संगणक तसेच त्याला लागणारे फर्निचर, प्रोजेक्टर,  पॉवर बॅकअप लाईट अशा सर्व बाबींसह लॅब  सुस्सज्य आणि  अद्ययावत करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रुजू होऊन फक्त तीन महिने होताच  प्राचार्य  डॉ. एम. एस. पवार यांनी देणगीच्या मदतीतून संगणक प्रयोगशाळा नव्या रूपात विध्यार्थ्यांना  खुली करून विदयार्थांची गैरसोय दूर केल्याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील यांनी देणगीदारांचे आणि प्राचार्यांचे विशेष अभिनंदन केले.

       यावेळी संस्था संचालक एम. जे. पाटील, ए. डी. मुल्ला, गुंडू सावंत, प्रा. व्ही. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले. आभार प्रा. एस. जे. पाटील यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यी, प्राध्यापक वर्ग व  कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment