करंजगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाई करावी - अनिल गावडे यांचे तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2022

करंजगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये खोटी माहिती देणाऱ्यावर कारवाई करावी - अनिल गावडे यांचे तहसिलदारांना निवेदन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       करंजगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये खोटी माहिती सादर करणाऱ्या दोषीवर निलंबनाची कारवाई करुन गुन्हे नोंद करावेत. अशी मागणी करंजगाव येथील अनिल गावडे यांनी तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 

       करंजगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये काही उमेदवारांनी निवडणूक अर्ज प्रक्रियेमध्ये खोटी माहिती सादर केलेली आहे. काही उमेदवारांना दोन पेक्षा जास्त अपत्य असून देखील खोटी माहिती सादर केलेली आहे. त्यामुळे या उमेदवारांची पुनश्च फेर तपासणी करुन दोषीवर निलंबराची कारवाई करावी. तोपर्यंत निवडून आलेल्या ग्रामपंचायत कार्यकारणीला स्थगिती द्यावी अशी मागणी श्री. गावडे यांनी तालुका निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. 

No comments:

Post a Comment