वाघोत्रे नजिक गोवा बनावटीची दारू जप्त, गडहिंग्लज उत्पादन शुल्कची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2022

वाघोत्रे नजिक गोवा बनावटीची दारू जप्त, गडहिंग्लज उत्पादन शुल्कची कारवाई

राज उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत पकडलेला मुद्देमाल.
चंदगड / प्रतिनिधी
 हेरे-पारगड रस्त्यावर वाघोत्रे नजिक बॉयलर कोंबड्याची वहातूक करणाऱ्या महिंद्रा पिक अप गाडीतून गोवा बनावटीची दारू वहातूक करताना गडहिंग्लज उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून गजानन महादेव गिलबिले (वय वर्ष ३३ रा. बुजवडे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील १० बाॅक्स विविध कंपनीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. ३१ डिसेबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चंदगड तालुक्यात गोवा बनावटीची दारू तस्करीचा निर्बंधासाठी विधिध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.
    त्या अनुषंगाने हेरा -इसापूर दरम्यान गस्त घालत असताना गोव्या कडून येत असलेली महिंद्रा पिकअप अप गाडी तपासणी साठी अडवण्यात आली असता गाडीत  विविध कंपन्याचे १० बाॅक्स असून आले.यामध्ये एकूण रु. २,४८,०००/ - किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . कारवाई उप अधीक्षक. आर. एल. खोत, एम. एस. गरुड, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज ,किरण आ . पाटील , उप निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , चंदगड.एल.एन.पाटील , उप निरीक्षक , अजय लोंढे , उप निरीक्षक , एस . आर . ठोंबरे सहा . दु निरीक्षक , जवान वर्ग. बी.ए.सावंत , श्री . जी.एस. जाधव , श्री.एस.बी. चौगुले .ए.टी. थोरात ,योगेश शेलार , मनोज पवार व  कृष्णात पाटील यांनी केली . सदर गुन्हयाचा पुढील तपास किरण आ . पाटील , उप निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , चंदगड हे करत आहेत.

No comments:

Post a Comment