कोवाड महाविद्यालयात दुर्मिळ नाणी प्रदर्शनाला प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2022

कोवाड महाविद्यालयात दुर्मिळ नाणी प्रदर्शनाला प्रतिसाद

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल.  वृत्तसेवा 

      कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागाच्यावतीने  ऐतिहासिक साधनाच्या आधारे इतिहासाची  ओळख विद्यार्थ्यांना व्हावी. या उद्देशाने दुर्मिळ नाणी प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपक्रमशिल शिक्षक प्रकाश नांदुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एस. पवार होत्या. 

          प्रारंभी प्रास्ताविक डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले. यावेळी श्री. नांदूडकर यानी आपणांस लहानपनापासून् दुर्मिळ नाणी, मधुमक्षिकापालन, दुर्मिळ ग्रंथ आदी अनेक छदं मला जडले. ही आवड पुढे शिकताना वाढत गेली आणि त्यामुळे मला अनेक  छंद मला जपता आले. त्यातील नाणी संकलन एक होय. नाणी ही अत्यन्त दुर्मिळ आहेत. ही नाणी ही इतिहासाचे प्राथमिक साधन असून त्याआधारे राजवटीतील आर्थिक व्यवहार समजतो.तसेच राजाराजघराणे, धर्म, देव, देवता यांच्या आधारे तत्कालीन  जीवनाचे दर्शन घडते. त्याच बरोबर  नाण्यावरून समकालीन वेशभूषा, केशरचना, भाषा, लिपी, धातू आदी  क्षेत्रातील  प्रगती आणि कला, क्षेत्राबरोबर परकीय राजवट पद्धतीवर प्रकाश पडत असल्याचे सांगितले.  

        यावेळी नांदुडकर यांनी संकलन केलेल्या दुर्मीळ नाण्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. तर प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांच्याकडील संग्रहीत केलेल्या  परदेशीं  चलनही  प्रदर्शनात खास मांडले होते.

       यावेळी प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांच्यासह कु. सिंधू कांबळे,  कु.सुप्रिया देसाई यांनीही मनोगत व्यक्त केली. पाहुण्यांची ओळख डॉ. सदानंद गावडे करून दिली. सूत्रसंचालन प्रा. संदीप.मुंगारे यांनी केले. आभार प्रा. संगम दानवडे यांनी मानले. या प्रदर्शनाला संस्थाध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटील, संचालक एम. जे. पाटील, वाय. डी. मुल्ला यांनी भेट दिली.  डॉ डॉ. बी. एस. पाटील, डॉ. दीपक पाटील, प्रा. एस. जे. पाटील, डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. ए. के. कांबळे, डॉ. ए. एस. आरबोळे आदीसह विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment