ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सहकार्य करा - संदीप पाटील, डुक्करवाडी येथे ग्राहक दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2022

ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सहकार्य करा - संदीप पाटील, डुक्करवाडी येथे ग्राहक दिन साजरा

संदीप पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        माणूस हा जन्मापूर्वी आणि मृत्यू नंतर ही समाजात ग्राहक म्हणून वावरत असतो. पण त्याला ग्राहक हक्काची, कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागते. ग्राहक हक्कांबाबत सक्षम होण्याच्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्राहक हा ‘राजा’ होऊ शकेल असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचयातचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केले. डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील बी. डी. विद्यालयात ग्राहक दिन समारंभ वेळी बोलत होते. अध्यक्ष स्थानी प्राचार्य एस. एस. तुर्केवाडकर होते.

      यावेळी ग्राहक संघटनेचे जनक बिंदू माधव जोशी, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विलास नाईक म्हणाले, ``जाहिरातीच्या युगात कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जाते ती ग्राहकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू मूल्य ओळखून पारखून घ्यावी असे सांगितले. प्राचार्य एस. एस. तुर्कवाडकर यानी जागतीकीकरणाच्या युगात ग्राहकांनी आपल्या कर्तव्या विषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यासाठी अश्या सामाजिक कार्यकर्ते यांची भान असणाऱ्या संघटनेचे पाईक होण्यासाठी विद्यार्थी वर्गाला संबोधन केले.

       यावेळी प्रताप डसके, अमित पेडणेकर, अभिजीत किल्लेदार, विलास ओऊलकर, माजी अध्यक्ष विलास कागणकर, प्रा. प्रकाश बोकडे, प्रा. अजित सांबरेकर, प्रा. गावडे आदी उपस्थित होते. आभार उत्तम पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment