चंदगड नगरपंचायतीकडून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत हुतात्मा स्मारकाची स्वच्छता - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2022

चंदगड नगरपंचायतीकडून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत हुतात्मा स्मारकाची स्वच्छता


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत लोकसहभागातून राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ भारत अभियानाला जनमनात रुजवण्यासाठी तसेच लोकांच्या मनात शहरातील विविध स्मारक, बगिचे याबद्दल स्वच्छतेच्या जबाबदारीचे महत्वरूजवण्यासाठी रिस्पेक्ट टू फ्रिडम फायटर अनुषंगिक श्रमदान मोहिम  घेण्यात आली . या पार्श्वभूमीवर  चंदगड शहरातील भारताच्या स्वातंत्र्यलढयातील  स्वातंत्र्यसेनानी त्यांचे स्मारक याची स्वच्छता लोकसहभागातून व्हावी असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नेहरू युवा केंद्र व एनसीसी विभाग यांनी पुढाकार घेऊन स्वच्छता केली.

        स्वातंत्र्यसेनानी यांच्या भारतातील स्वातंत्र्यलढयामधील कार्याची दखल घेत त्यांचे कार्य तरूण मनात रुजवण्यासाठी या श्रमदान मोहिमेचे आयोजन केले होते.

      नगरपंचायतीकडून स्वातंत्र्यलढयात बलिदान दिलेल्या हुतात्मा स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. नगरपंचायतीचे स्वच्छता ब्रॅड अम्बेसिटर संजय साबळे यावेळी म्हणाले की' गांधीजीच्या स्वप्नातील भारत साकार करायचा असेल तर स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे. आपला परिसर, शाळा, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शासकिय कार्यालये यांची स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनले पाहिजे.'

     या श्रमदान मोहीम वेळी स्वच्छतेचे ब्रँड ॲम्बेसेडर संजय साबळे, एन. वाय. के एस. प्रतिनिधी अमेय सबनीस, ओंकार सबनीस इतर सदस्य, शहर समन्वयक (स्वच्छ भारत मिशन) राजेंद्र, दळवी, कर्मचारी वृंद, अधिकारी व पदाधिकारी चंदगड नगरपंचायत, चंदगड तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment