तुर्केवाडी येथे महापरिनिर्वाण दिन संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

07 December 2022

तुर्केवाडी येथे महापरिनिर्वाण दिन संपन्न

 


 चंदगड / प्रतिनिधी
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव बी.एड.कॉलेज मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  ६६ व्या महापरिनिर्वाण  दिनानिमित्त विनम्र अभिवादन करणेत आले.
 अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य एन.जे.कांबळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागप्रमुख प्रा. ग. गो. प्रधान होते.

   प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पजन व दीपप्रज्वलनाने झाली. 'आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानपीपासूपणा व वाचनाचा व्यासंग हे गुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कडून घेतले तर ते सक्षम व परखड बनतील' असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रधान ग. गो. यांनी केले. अध्यक्ष प्र. प्राचार्य एन.जे.कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आढावा सांगून त्यांच्या विचारांबाबत वैचारिक जागृती होणे गरजेचे असलेचे मत व्यक्त केले. महापरीनिर्वाण दिनानिमित्त राबविलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये सविता चौगुले,तुकाराम नाईक, प्रियांका पाटील, उज्वला कांबळे , काजल गावडे,कमल नाईक यांनी सहभाग नोंदवून मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष महादेवराव वांद्रे, फार्मसीचे प्राचार्य अमर पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य एस. पी. गावडे, कार्यालयीन अधिक्षिका श्रीम-स्वप्ना देशपांडे, प्रा. सचिन कांबळे, प्रा. गुरव व्ही. पी. , प्रा. पृथ्वी कांबळे, प्रशांत काजीर्णेकर, बी. एड्. प्रशिक्षणार्थी सहभागी होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशिक्षणार्थी तुकाराम नाईक यांनी केले. प्रास्ताविक युवराज वाघमोडे यांनी केले तर आभार प्रियांका पाटील यांनी मानले.



No comments:

Post a Comment