मोरेवाडी येथील रवळनाथ दुध संस्थेत १ लाख १४ हजारांचा अपहार, माजी अध्यक्ष, सचिवांवर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2022

मोरेवाडी येथील रवळनाथ दुध संस्थेत १ लाख १४ हजारांचा अपहार, माजी अध्यक्ष, सचिवांवर गुन्हा दाखल

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          मोरेवाडी (ता. चंदगड) येथील श्री. रवळनाथ सहकारी दुध संस्थेत माजी सचिव तातोबा जोतीबा अमृसकर व माजी अध्यक्ष मल्लू बाबू गावडे यांनी संगनमताने १ लाख  १४ हजार ५०९ रूपये १८ पैशाचा अपहार केल्या प्रकरणी या दोघांवर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

          या बाबत पोलिसांतून मिळालेली माहीती अशी, माजी सचिव तातोबा जोतीबा अमृसकर व माजी अध्यक्ष मल्लू बाबू गावडे यानी रवळनाथ दुध व्यावसायीक संस्थेतील कार्यकाल संपलेला असताना सुध्दा यातील तातोबा अमृसकर व मल्लू गावडे यांनी संगणमत करून दिनांक २१/११/२०२० ते ३०/११/२०२० या कालावधीत संस्थेच्या बॅक खात्यावरील दोन लाख १२ हजार ३०० तीनशेहे रुपये काढुन त्या रक्कमेपैकी थोड़ी रक्कम दूध बिले व अनामत खर्चीक दाखवून रोज किर्दीला दिसणारी शिल्लक एक लाख  चौदा हजार ५०९ रूपये १८ रुपये रक्कम नुतन सचिव खंडेराव मारूती अमृस्कर यांचेकडे जमा करणे आवश्यक असताना या दोघाही आरोपीनी सदरची रक्कम त्यांच्याकडे जमा न करता स्वताच्या फायद्याकरीता वापरुन सदर रकमेचा अपहार केला. म्हणून चंद्रकांत दाणी (रा. चंदगड) जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग २ यांनी चंदगड पोलिसात फिर्याद दिली असून गावडे व अमृसकर यांचेवर  ३५१/२०२२ भा. दं. वि. सं. कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो. हे. काॅ. श्री. सुतार करत आहेत.

No comments:

Post a Comment