माणगाव येथील विमा सल्लागार गजानन राऊत यांना एल.आय.सी. चा एमडीआरटीचा बहुमान, युएसए येथे परिषदेत होणार सहभागी - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2022

माणगाव येथील विमा सल्लागार गजानन राऊत यांना एल.आय.सी. चा एमडीआरटीचा बहुमान, युएसए येथे परिषदेत होणार सहभागी

गजानन राऊत

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      माणगांव  (ता.चंदगड) येथील प्रतिथयश विमा सल्लागार गजानन बाबुराव राऊत यांनी चंदगड, आजरा, गडहिंग्लज एलआयसी शाखेमधून प्रथमच MDRT(USA)चा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे त्यांना जून 2023 मध्ये Nashville Tellesee (USA) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

        श्री. राऊत हे गेली 16 वर्ष विमा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. गेल्या 7 वर्ष ते CM क्लब मेंबर असून अचूक सल्ला व तत्पर सेवेमुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांनी एलआयसी विमा सल्लागार म्हणून गेली १६ वर्षे केलेल्या कामाची हि पोहोचपावती आहे. याकामी त्यांना वरिष्ठ शाखाधिकारी विनायक गायतोंडे, किरण अवचिते, सनंदन गायकवाड व विकास अधिकारी संजीव सोलापूरे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment