संग्रहित छायाचित्र |
चंदगड / प्रतिनिधी
कलिवडे (ता. चंदगड) फाट्यावर अवकाळी पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महिला कामगार घरी घेऊन जाणारी मॅक्स बोलेरो गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह १४ महिला गंभीर जखमी झाल्या.ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली.
यामध्ये अपघातध्ये चार महिलाना गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जंगमहट्टी फाट्यावर असलेल्या काजु फॅक्टरी मधून काम संपल्यानंतर मॅक्स बोलेरो गाडी नं KA20-N2113 या गाडीतून चालक महेश मारुती डुरे (वय २९, रा. मजरे कारवे) हा महीलाना कलिवडे येथे घरी सोडायला जात असताना कलिवडे फाट्यानजीक चालक डुरे याचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मॅक्स गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यामध्ये गाडीतील चालकासह महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच सर्व जखमींना बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.या अपघाता मध्ये महिलांना डोके,हात,पाय,चेहरा आदी ठिकाणी दुखापत झाली आहे.जखमीवर बेळगाव येथील रूग्णालयात उपचार सूरू आहेत.दोघी महिलांची्र प्रकृती गंभीर असून अन्य महिलाची प्रकृती स्थिर आहे.
जयश्री दत्तू कांबळे (वय ४०), ठकूताई जानू कोकरे (वय १८), छाया संजय मोरे (वय ३२), बमाबाई लक्ष्मण लांबोर (वय ५४), आरती सिताराम गावडे (वय २०) सुमित्रा दशरथ कांबळे (वय ४५ ), अनिता शंकर कांबळे (वय ४६), निलम अमृत कांबळे (वय २८), मनाली महेश कांबळे (वय ३० ), शोभा संभाजी कांबळे (वय ३९ ), गीता गणू कांबळे (वय ४२ ), शालन संभाजी गुरव (वय ४८ ), पूनम दत्तू कांबळे (वय २१, सर्वजणी रा. कलिवडे, ता. चंदगड) अशी जखमींची नावे आहेत.याबाबत चंदगड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
No comments:
Post a Comment