चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा.लि, लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना कारखान्याने गळीत केलेल्या ऊसाची १६ ते ३०नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंतची ऊस बिले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.
२०२२-२३ या गळीत हंगामात कारखाना उत्तम प्रकारे सुरु असून यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार व कामगार यांचे मोलाचे सहकार्य दौलत-अथर्व कारखान्याला मिळत आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या गळीत हंगामासाठी कारखान्यामार्फत एफआरपी पेक्षा जादा म्हणजेच प्रति टन रु.३००१/-दर जाहिर केला असून, त्याला अधिन राहून वेळेत ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची पंरपंरा कारखान्याने कायम ठेवल्याचे अध्यक्ष मानसिंग.खोराटे यानी सांगितले.चालू गळीत हंगामात ७ लाख मे.टन ऊस गाळपाचे उध्दिष्ट असून, त्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन व कामगार प्रयत्नशिल आहेत.त्यामुळे तसेच शेतकऱ्यांनी पिकलेला जास्तीत जास्त ऊस दौलत -अथर्व कारखान्याला पुरवठा करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी संचालक पृथ्वीराज खोराटे,विजय पाटील, टेक्निकल युनिट हेड ए. आर. पाटील, सेक्रेटरी विजय मराठे व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment