सामुहिक कृतीतून सर्वांचा विकास होतो - अनंत पाटील, हलकर्णी महाविद्यालयामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2022

सामुहिक कृतीतून सर्वांचा विकास होतो - अनंत पाटील, हलकर्णी महाविद्यालयामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यानचंदगड / प्रतिनिधी
सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर ते निश्चित यशस्वी होते. एका ध्येयाने प्रेरीत होऊन कार्य करणे हे प्रत्येकाचे काम आहे. मनोभावे सेवा केली तर त्यातुन मिळणारे सुख ही मोठे असते. सामूहिक एकजूट यशापर्यंत पोहचवत असते. देशाच्या प्रगतीमध्ये सकारात्मकता, सहकार्य, सदभावना, विवेकवाद या गोष्टी महत्वपूर्ण ठरतात. त्यातून आपल्यावरोवरच देशाचा विकास होतो प्रेम व एकतेने जग जिंकता येते असे प्रतिपादन शिनोळी येथील ॲटलास कंपनीचे मनुष्यबळ प्रमुख  अनंत पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. डी. अजळकर होते.

प्रास्ताविक प्रा.  मधुकर जाधव यांनी करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. प्राचार्य डॉ. अजळकर म्हणाले तुमचे काम ही तुमची ओळख आहे. त्यामुळे सर्वांनी कामाशी बांधील राहणे गरजेचे आहे. सहकार्याची भवना मनातटेवून काम करा त्यातून सर्वांची प्रगती होत असते. आपली एक वेगळी ओळख असणे ही आपल्या कार्याची पावती होय.
         यावेळी प्राचार्य डॉ. अजळकर यांच्या हस्ते पाटील यांचा शाल, श्रीफळ व देवून स्वागत करण्यात आले. 
  या कार्यक्रमासाठी डॉ. राजेश घोरपडे, प्रा. एम. के. जाधव, प्रा. ए. एस. वागवान, प्रा. ए. एस. जाधव, प्रा. के. एम. गोनुगडे,. बी. बी. नाईक, श्रीपती कांबळे, सी. ए. पाटील, विलास वाईगडे, नंदूकुमार बोकडे, संदिप पाटील, मनोहर कांबळे, माधुरी पाटील, माया पाटील आदि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सपंदा सावरे यांनी केले, तर आभार अधिक्षक प्रशांत शेंडे यांनी मानले.


No comments:

Post a Comment