चंदगड /प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातुन गोव्याला बॉयलर कोंबड्या वाहतूक करणारे वाहनधारक गोव्याहून परत येताना तिलारी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या ओढ्यात पोल्ट्रीतील वेस्ट टाकून पाणी दूषित करत आहेत.काल या पोल्ट्री वाहनधारकांना "वर्ल्ड फॉर नेचर" या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ओढ्यात मृत कोंबड्या, स्किन, वेस्ट असे अत्यंत दुर्गंधी युक्त व अपायकारक टाकाऊ पदार्थ टाकत असताना रंगेहाथ पकडून सुचना देण्यात आल्या.
काही वाहनधारक गोव्याला पोल्ट्रीच्या कोंबड्या भरून घेऊन जातात. टेम्पोचालक परत येताना आपल्या गाड्या तिलारी घाटातील ओढ्यात धुतात. यावेळी ते कोंबड्यांची विष्ठा, त्यांची पिसे, मृत कोंबड्या ओढ्यात टाकतात. याबाबत "वर्ल्ड फॉर नेचर" या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे माहीती दिली होती. मात्र, याची कोणतीच दखल घेतली गेली नाही.त्यामुळे आज वर्ल्ड फॉर नेचर" या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका पोल्ट्री वाहनधारकांला मृत कोंबड्या, स्किन, वेस्ट तिलारी घाटातील ओढ्यात टाकताना पकडलं. यावेळी त्याला सुचना देण्यात आल्या.
तिलारी – गोवा मार्गावर वाहतूक करणारे पोल्ट्री वाहनधारक हे मृत कोंबड्या, स्किन, वेस्ट असे अत्यंत दुर्गंधी युक्त व अपायकारक टाकाऊ पदार्थ घाटातील ओढ्यात टाकतात. यामुळे ओढ्यातील पाणी दुषित व दुर्गंधीयुक्त बनते. हे पाणी ओढ्याच्या काठावर असणाऱ्या अनेक गावामधील लोक पिण्यासाठी वापरतात. यामुळे गावकऱ्यांच्या जीवितास हानी पोहचू शकते. तसेच भारतातील सर्वात महत्वाचं जैविक वारसास्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या ‘जायफळाची राईत’ हे दुर्गंधीयुक्त पाणी मिसळले जाते. दरम्यान, राजरोसपणे मृत कोंबड्या घाटात व ओढ्यात टाकणाऱ्या पोल्ट्री चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी "वर्ल्ड फॉर नेचर" या निसर्गप्रेमी संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अभिजीत सुनिल वाघमोडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment