राष्ट्रीय सेवा योजना हे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ - पोलीस निरीक्षक घोळवे, तावरेवाडी येथे श्रमसंस्कार शिबीरीचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2022

राष्ट्रीय सेवा योजना हे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ - पोलीस निरीक्षक घोळवे, तावरेवाडी येथे श्रमसंस्कार शिबीरीचे उद्घाटन

चंदगड / प्रतिनिधी

        राष्ट्रीय सेवा योजना हे स्वप्न पूर्ण करणारे व्यासपीठ आहे असे उद्गार काढले त्याबरोबर त्यांनी आपल्या मनोगतामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये एन एस एस मधील सर्व गुणसंपन्न, नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास, अपयश पचवण्याची क्षमता ,स्वप्ने पूर्ण होण्या पर्यंत लढण्याची क्षमता, स्वतःची मानसिक तयारी, श्रमसंस्कार शिबिरामध्ये केली जाते असे प्रतिपादन चंदगड चे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यानी केले.ते तावरेवाडी ता.चंदगड येथे हलकर्णी ता.चंदगड यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिरात उद्घाटक या नात्याने बोलत  होते.अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते.
यावेळी गोपाळराव पाटील यांनी तावरेवाडी हे तालुक्यातील आदर्श गाव आहे अनेक शासकीय, विद्यापीठाचे विधायक कार्यक्रम करण्यासाठी तावरेवाडी ग्रामस्थ नेहमीच अग्रेसर असतात एनएसएसच्या मध्ये श्रमाला संस्काराची जोड मिळते यांचे शिबिरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आपले भविष्य ठरवले पाहिजेत त्याप्रमाणे अभ्यासाचे नियोजन केले पाहिजेत असे मत व्यक्त केले. यावेळी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी मी एनएसएसचाच आदर्श स्वयंसेवक होतो माझ्या व्यक्तिगत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एनएसएसचा सिंहाचा वाटा आहे असे उद्गार काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिबिरा संदर्भात मार्गदर्शन केले.          प्रास्ताविक एनएसएस विभाग प्रमुख प्रा. यु एस पाटील यांनी केले. याप्रसंगी राम कागनकर यांनी एनएसएस मधील अनुभव आणि अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी बी कॉम भाग तीन मधील कुमार सुयश पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल गोपाळराव पाटील यांच्या हस्ते तर हलकर्णी महाविद्यालयाची एनसीसी विद्यार्थिनी कुमारी अश्विनी केसरकर हिची पोलीस पदी निवड झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संचालक शिवाजी हसबे, मारुती बसर्गेकर, बाबुराव शिंदे, सरपंच सौ माधुरी कागनकर,उपसरपंच गणपती खनगुतकर, भागोजी निंगाप्पा कागनकर, काशिनाथ लक्ष्मण कागनकर, मारुती गंगाराम कागनकर, मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी जे गावडे व माधुरी सुतार यांनी केले तर आभार प्रा.शाहू गावडे यानी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अंकुश नौकुडकर प्रा.ज्योती व्हटकर प्रा. ज्योती उत्तुरे , राजू बागडी यांनी सहकार्य केले.No comments:

Post a Comment