चंदगड/प्रतिनिधी
कोदाळी (ता. चंदगड (सध्या रा.बिल्डिंग नं ५७,रुम नं.१००२ पतंगनगर,घाटकोपर,पूर्व मुंबई) येथील बाळकृष्ण शंकर गावडे या गृहस्थाने राधानगरी तालुक्यातील मांगोली येथील दोघा युवकांची सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून सहा लाख ६९ हजार ५०० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राधानगरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुहास रघुनाथ पाटील व सौरभ सोमेश्वर कांबळे (दोघेही रा.मांगोली ता.राधानगरी,जि कोल्हापुर )अशी फसवणूक झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी बाळकृष्ण गावडे याने सुहास पाटील व सौरभ कांबळे या युवकांना सैन्य दलात नोकरी लावतो असे सांगून जाॅयनिग लेटर देणे,मेडिकल करणे,लेखी परीक्षा देणे आदी वेगवेगळी कारणे सांगून मांगोली, शेळेवाडी,पुणे व चंदगड येथे २९/१/२०२०ते २८/६/२०२१ या कालावधीत गुगल पे व बॅकेद्वारे सहा लाख ६९ हजार ५०० रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गावडे याच्यावर राधानगरी पोलीसात भादविस कलम ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद सुहास पाटील यांनी दिली असुन अधिक तपास पोसई ए व्ही पाटील करत आहेत.
No comments:
Post a Comment