चंदगड विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2023

चंदगड विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       चंदगड विधानसभा मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख, युवा सेना तालुका प्रमुख, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख,महिला विधानसभा प्रमुख, महिला उपजिल्हा प्रमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून  त्यांना मुंबई येथे पक्षाच्या कार्यालयात आम. भरत गोगावले यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. 

     चंदगड विधानसभा उपजिल्हा प्रमुख बाबू भिमान्ना नेसरकर  (हल्लारवाडी), चंदगड विधानसभा महिला प्रमुख पदी सौ. मंगल तिबले (माजी सरपंच सिरसंगी, ता.आजरा) महिला उपजिल्हा प्रमुख पदी सौ. संगिता पाटील (ढोलगरवाडी) किरण पुंडलिक कोकितकर (नागरदळे) यांची ग्राहक संरक्षण कक्षाच्या तालुका प्रमुख, तुकाराम गावडू पाटील (हाजगोळी) यांची युवा सेना तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. नुतन पदाधिकाऱ्यांना आमदार भरत गोगावले यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सचिव संजय मोरे, चंदगड विधानसभा प्रमुख नितीन पाटील, चंदगड तालुका प्रमुख कल्लापान्ना निवगिरे, उमेश पाटील, विनोद पाटील,रामचंद्र पाटील, ज्ञानेश्वर जाधव, सातेरी गावडे, नामदेव गोरल, संतोष बुडके, युवराज सुतार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment