कुर्तनवाडी धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विक्री साठी नेताना रंगेहाथ पकडले, धान्य दुकानदार महिलेसह गाडीचालकावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद, ३ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2023

कुर्तनवाडी धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विक्री साठी नेताना रंगेहाथ पकडले, धान्य दुकानदार महिलेसह गाडीचालकावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद, ३ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त

  


चंदगड/प्रतिनिधि

कुर्तनवाडी (ता. चंदगड) येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून खुल्या बाजारात गहु,तांदूळ,नाचना आदी धान्य विक्री साठी बोलेरो पिकअप गाडीतून  नेत असताना अडकुर-मलगेवाडी माळावर रंगेहाथ पकडले.याप्रकरणी दुकान चालक श्रीमती अंजली अजितकुमार पाटील( रा.कुर्तनवाडी) व गाडीचालक महेश गणपती साळोखे (रा.मलिग्रे ता.आजरा) या दोघांवर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की कुर्तनवाडी येथील सरकार मान्य धान्य दुकान श्रीमती अंजली पाटील या चालवतात, काल सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH-09-CU-8023 या गाडीतून नाचना तीन क्विंटल ३०किलो ,किंमत ९९००रु,तांदूळ सहा क्विंटल २५किलो,किंमत १८७५० रूपये,व गहु सहा क्विंटल ५०किलो किंमत १९५०० रुपये असे धान्य भरून या गाडीतून मलिग्रे ता.आजरा येथे नेत असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चंदगड पोलिसांनी रंगेहाथ पकडले. 

      तीन लाखांची बोलेरे गाडी असा एकुण ३ लाख ४८ हजार १५० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दुकान चालक श्रीमती अंजली अजितकुमार पाटील( रा.कुर्तनवाडी) व गाडीचालक महेश गणपती साळोखे (रा.मलिग्रे ता.आजरा) या दोघांवर अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.आहे.याबाबतची फिर्याद चंदगड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अव्वल कारकून सचिन शंकर गाडीवड्ड यानी चंदगड पोलिसात दिली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करत आहेत.
No comments:

Post a Comment