कृष्णा व्हॅलीॲडव्हान्स ॲग्री सेंटरला राष्ट्रीय पुरस्कार, गुरुवार १२ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे होणार सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2023

कृष्णा व्हॅलीॲडव्हान्स ॲग्री सेंटरला राष्ट्रीय पुरस्कार, गुरुवार १२ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे होणार सन्मान

पुरस्कार प्राप्त  कृष्णा व्हॅली ॲडव्हान्स ॲग्री सेंटर

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

           कृषी मंत्रालय भारत सरकार तसेच मॅनेज हैदराबाद यांच्या मार्फत उत्तूर ता. आजरा येथील कृष्णा व्हॅली डव्हान्स्ड ग्रीकल्चर फाऊंडेशनला संपूर्ण देशामधून सन २०२२ सालचा सर्वश्रेष्ठ प्रशिक्षण केंद्र' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा मानाचा पुरस्कार ग्री क्लिनिक अँड ग्री बिझीनेस योजनेअंतर्गत असून १२ जानेवारी २०२३ रोजी भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते वितरीत केला जाणार आहे. 

       कृष्णा व्हॅली डव्हान्स्ड ग्रीकल्चर फाउंडेशनचे २० वर्षाचे परिश्रम, त्यामुळे तयार झालेले प्रशिक्षणार्थी, उद्योग प्रस्थापित केलेले बहुसंख्य युवक आणि त्यांच्या कार्यामुळे झालेला कृषी विस्तार यामुळे हा पुरस्कार देणेत आला आहे. सेंटर मधून प्रशिक्षण घेऊन आजवर हजारो बेरोजगार युवक स्वत:च्या पायावर उभे राहतात. समाजात स्वतः ची नवी ओळख करण्यात यशस्वी झाले आहेत. ग्रामीण भागासाठी सदर सेंटर हे नव उद्योजकांसाठी कित्येक वर्षे संजीवनीच कार्य पार पाडत आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी सदर पुरस्कार गुरुवारी वितरित करण्यात येणार आहे.

       या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे असून यासाठी कृष्णा व्हॅली डव्हान्स ग्रीकल्चर फाउंडेशनचे चेअरमन मार्गदर्शक प्रवीण लुंकड, सचिव नारायण कामत, अब्दुलवहाब देवर्षी, नोडल ऑफीसर सचिन पाटील तसेच समन्वयक सुधाकर जोशीलकर व सहकारी कार्यरत आहेत. त्यांचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment