मलतवाडी येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून महिला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2023

मलतवाडी येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून महिला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         ग्लोबल मराठा रणरागिणी ऑर्गनायझेशन आणि युवा परीवर्तन आणि ग्रामपंचायत मलतवाडी (ता. चंदगड) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वित्त आयोगाच्या निधीमधून महिला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय उत्साहात‌ संपन्न झाले. प्रशिक्षण कार्यक्रममध्ये १० प्रकारचे मसाले, ६ प्रकार ग्रेव्ही आणि ग्रेव्हीतील भाज्या, १० प्रकारचे केक, १० प्रकारचे आईस्क्रीम, कापडी पिशवी प्रशिक्षण, मेहंदी प्रशिक्षण इ.प्रशिक्षण देण्यात आले.

       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मलतवाडीच्या सरपंच भारती सुतार, उपसरपंच जयवंत पाटील, निवृत्ती पाटील, राणबा पाटील, राजेंद्र पाटील, मालन सुडंकर, नम्रता पाटील, निकीता पाटील, मोहिनी पाटील आणि ग्रामसेवक राजेंद्र सांगवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

       कार्यक्रमाला युवा परीवर्तनचे कोल्हापूर जिल्हा मॅनेजर जयकुमार देसाई, युवा परीवर्तन चे बीडीएम दिपक कुडाळकर, ग्लोबल मराठा रणरागिणी ऑर्गनायझेशन अध्यक्ष धन्वंतरी देसाई, फिल्ड काॅर्डिनेटर ओमकार पाटील, संजना नेवगे, पूनम बूरूड, प्रशिक्षिका वंदना कातकर, संगिता लोखंडे, राजश्री निकम, महादेव कातकर, ग्रामपंचायत कर्मचारी रणजीत जट्टेवाडकर, विष्णू सावंत आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment