१५ जानेवारी पर्यंतची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - इको केन कारखान्याचे सी. ई. ओ. प्रिथ्वी दोड्डाणावर यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2023

१५ जानेवारी पर्यंतची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - इको केन कारखान्याचे सी. ई. ओ. प्रिथ्वी दोड्डाणावर यांची माहीती

म्हाळुंगे येथील इको केन कारखाना

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          म्हाळुंगे कारखान्याने जानेवारी १५ अखेर गळीतास आलेल्या उसाचे बिल जमा केले असून यापुढील उस बिले प्रत्येक १५ दिवसाला दिली जाणार आहेत अशी माहिती कारखान्याच्या वतीने कारखान्याचे सी. ई. ओ. प्रिथ्वी दोड्डाणावर यांनी दिली.

इको केन कारखान्याचे सी. ई. ओ. प्रिथ्वी दोड्डाणावर

     या गाळप हंगामात कारखान्याने दिनांक २० जानेवारी २०२३ अखेर गाळपाचे ७५ दिवस पूर्ण केले आहेत. यादरम्यान अनेक अडचणीवर मात करत २ लाख ५५ हजार मे. टनाचे गाळप केले आहे. दिनांक १५ जानेवारी २०२३ पर्यंत गळीतास आलेल्या २ लाख ४२ हजार मे. टनाचे जाहीर दराप्रमाणे ऊस बिल कारखान्याने अदा केले आहे. जानेवारी १५ अखेर उस बील आदा करनारा इको केन हा जिल्हयातील नाहीतर राज्यातील पहिला कारखाना आहे. यापुढे प्रत्येक १५ दिवसाला ऊस बिल करण्याचा कारखान्याचा मानस आहे. १५ जानेवारी  नंतर जास्तीत जास्त तोडणी वाहतुक यंत्रणा चंदगड तालुक्यात कार्यान्वित करीत आहे.  

         ऊस बिलाबाबत काही शंका असल्यास किंवा ऊस बिल पाठवायचा असल्यास संबंधित गट विभागाशी संपर्क साधावा. तसेच उसा संदर्भात काही तक्रार असेल तर यासाठी उप शेती अधिकारी यांची तक्रार निवारण अधीकारीपदी नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त ऊस पाठवून सहकार्य करावे. कारखान्याने नेहमी शेतकरी हा प्रमुख घटक म्हणून पाहिला असून कारखाना कोणतीही उपपदार्थाचे उत्पादन घेत नसताना देखील फक्त साखर कारखान्यावर दिलेला दर आदा केलेले ऊस बिल ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. 

        कारखाना  लवकरच शेतकरी संबंधित ऊस विकास योजना तसेच अनेक कार्यक्रम राबवणार आहे. यावर्षी येणाऱ्या प्रत्येक ऊसाला वेळेत आणि पूर्ण बिल दिले जाणार आहे. कारखान्याने भागात जास्तीत जास्त यंत्रणा राबवली असून चंदगड तालुक्यातील उसाला प्रथम प्राधान्य देणार आहे. यावेळी कारखान्याचे सी. एफ. ओ. आनंदकुमार केशवपल्ली, जनरल मॅनेजर सुनील पाटील व मॅनेजर बाबासाहेब देसाई उपस्थित होते.

No comments:

Post a Comment