महादेवराव वांद्रे बी. एड. कॉलेज विद्यार्थ्यांची कोवाड विद्यालयाला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2023

महादेवराव वांद्रे बी. एड. कॉलेज विद्यार्थ्यांची कोवाड विद्यालयाला भेट


  तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे बी. एड. कॉलेज अंतर्गत शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन व अध्यापन केंद्राना भेटी या प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांनी श्री राम विद्यालय कोवाड (ता. चंदगड) या विद्यालयाला भेट देऊन 

          तेथील शालेय प्रार्थना, तासिकांचे वेळापत्रक, फलकलेखन, शाळेचे वार्षिक नियोजन, आर्थिक ताळेबंद, शिक्षक व विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रक यासंबंधी माहिती घेतली. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  यांची ओळख करून घेतली. तसेच दिवसभर शाळेत घडणाऱ्या उपक्रमाचे निरीक्षण केले. यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. पाटील, प्रा. अशोक पाटील, प्रा. विनायक पाटील यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment