कुरणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य मुलींच्या खो - खो स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2023

कुरणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य मुलींच्या खो - खो स्पर्धेचे आयोजन

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड तालुक्यातील कुरणी येथे ७४ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य मुलींच्या खो - खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

      इयत्ता १ली ते ७ वी पर्यंतच्या मुलींना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. दि  २८ व २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता वि. म. कुरणीच्या क्रीडांगणावर या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच फायनलच्या दोन्ही संघाना व प्रशिक्षकांना मेडल्स देण्यात येणार आहे. संघ नोंदणी २६ जानेवारी पूर्वी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment