चिमणेत विद्यार्थी महासंघाच्या मेळाव्याचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2023

चिमणेत विद्यार्थी महासंघाच्या मेळाव्याचे आयोजनआजरा / सी. एल. वृत्तसेवा           

       चिमणे (ता. आजरा) येथे चिमणे पंचक्रोशी माजी विद्यार्थी महासंघ - मुंबई व  संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज विद्यालय, चिमणे यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे.

     नवकृष्णा व्हॅली उत्तूरचे प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांचे शालेय विद्यार्थी वर्तमान व भविष्यातील संधी या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमात प्रभाकर येसादे, बी. ए. नादवडेकर, राजाराम नादवडेकर, शिवाजी तांबेकर संतोष नादवडेकर, नित्यानंद पाटील आदीसह आजी - माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.No comments:

Post a Comment