पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेचा २८ वा वर्धापन दिन विविध उपक्रमानी संपन्न, संस्था संचालक मंडळ, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या योगदानातून पार्वती - शंकर शैक्षणिक संकुलाची चौफेर प्रगतीची वाटचाल - विजय सावेकर - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2023

पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेचा २८ वा वर्धापन दिन विविध उपक्रमानी संपन्न, संस्था संचालक मंडळ, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या योगदानातून पार्वती - शंकर शैक्षणिक संकुलाची चौफेर प्रगतीची वाटचाल - विजय सावेकर



उत्तुर / सी. एल. वृत्तसेवा 
 उत्तूर ता आजरा येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व  चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पार्वती -शंकर शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेचा २८ वा वर्धापन दिन विविध शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला, अध्यक्षस्थानी संस्थाधक्ष बसवराजआण्णा करंबळी होते. संस्थेचे संचालक विजय सावेकर ,शाळेचे पालक प्रतिनिधी अनिल जांभळे , शिवपुत्र हिडदुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        प्रारंभी सर्व निमंत्रिताचे औक्षण करून व मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले.  संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण बसवराजआण्णा करंबळी यांच्या हस्ते संपन्न झाले. वाद्य वृंदाच्या सुरेल साथीने गीतमंच पथकाने राष्ट्रगीत सादर केले. संस्थेच्या ध्वजास सांघिक मानवंदना देण्यात आली. इयत्ता दहावी विद्यार्थी पथकाने कवायत संचलन करून मानवंदना दिली. 

         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ वैशाली पाटील म्हणाल्या १३ जानेवारी १९९५ रोजी संस्थेची अधिकृत स्थापना झाली. आज २८ वा वर्धापन दिन संपन्न करताना बालवाडी ते माध्यमिक अशा सर्व विभागाने केलेल्या विकासात्मक वाटचालीचे सिंहावलोकन करण्याचा हा दिवस करंबळी कुटुंबीयांनी दिलेल्या पाठबळामुळे सुकर झाला.
           संस्थापक शिवपुत्रआण्णा करंबळी यांनी उत्तूर परिसरातील सामान्य कुटुंबातील मुला- मुलींचा शैक्षणिक गुणवत्तापूर्ण विकास हे बाळगलेले ध्येय संस्थेने अल्पावधीत साध्य केले आहे .उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी ,संचालक डॉ. व्ही एम. पाकले , प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, सेक्रेटरी सुरेश मुरगुडे आदी सर्व संस्था संचालकांनी जे जे उत्तम ते ते करण्याचा निर्णय घेऊन ते ते प्रत्यक्षात आणले .याचेच द्योतक म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमातून सलग १३ वर्ष शंभर टक्के एस.एस.सी.बोर्ड परीक्षा निकाल, ९०  टक्के हून अधिक संपादनूक असणारे एस. एस .सी .चे १३१ विद्यार्थी ,शिष्यवृत्तीधारक १४९  विद्यार्थी, एन. एम. एम. एस. १३१ विदयार्थी गुणवत्ताधारक आहेत.
 संचालक विजय सावेकर यांनी संचालक मंडळ शिक्षक विद्यार्थी व पालक यांच्या योगदानातून संस्थेने चौफेर विकास साधल्याचे नमूद करून यापुढेही यशाची वाटचाल सुरू ठेवण्याचे आवाहन शिक्षक व विद्यार्थ्यांना केले. रंगकुंजसारखा उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम ,आविष्कार क्रीडा महोत्सव ,सलग १९  वर्ष बालवैज्ञानिक संमेलन , अटल टिंकरिंग लॅब , प्रयोगशील शेतकरी पुरस्कार , बालोपासनेच्या माध्यमातून सुसंस्कार असे कितीतरी उपक्रम शैक्षणिक गुणवत्ता टिकवून संस्थेने यशस्वी केले आहेत . चतुरंग बुद्धिबळ स्पर्धा, आकाशदर्शन, विज्ञान रॅली याही आयोजनातून शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी ,संस्थेने समर्थपणे पेरली आहे. 
           शुभस्य शिघ्रम हा संस्थेचा बाणा. गुणवत्ता आणि उत्तम यशासाठी तडजोड नाही, हेच व्रत संस्थेने जोपासले. ही परंपरा टिकवणे आणि वाढविणे याचे स्मरण म्हणजे हा वर्धापन दिन.
      या कार्यक्रमात माध्यमिक विद्यार्थिनींनी "माणसाने माणसाशी माणसासम वागणे" हे सुश्राव्य गीत सादर केले .त्याला मार्गदर्शन व वाद्याची साथ शिक्षक बाळासो जाधव व इयत्ता नववीचा विद्यार्थी सर्वेश लोखंडे यांनी दिली.' 
          सत्य शिवाहून सुंदर हे 'या शब्दात इयत्ता सातवीमधील कु. तनिष्का सरमलकर हिने शाळेबद्दल विचार मांडले. 
           बाल मंदिर मधील कु.शरण्या माळवकर, कु. रेवती पाटील , कु.काव्या कानोलकर, कु. दूर्वा भाईगडे , कु.सिद्धी पन्हाळकर या चिमुकल्याणी 'आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा' हे गीत गायन सादर केले. त्याला मार्गदर्शन सौ जी.टी. चाळक व शिक्षिका श्रीमती पी आर चौगुले यांनी केले 
            .इयत्ता  ९ वी मधील कु. स्वर्णिका पाटील हिने 'संस्काराचा झरा , ज्ञानाचा सागर नि अनुभवाची खाण 'या शब्दात संस्था व शाळा यांचे भावपूर्ण ऋण  व्यक्त केले. इंग्लिश मीडियम स्कूल मधील इयत्ता चौथी मधील कु.ओजल मगदूम हिने इंग्रजीमधून शाळेबद्दल भाषण केले. 
           आविष्कार स्पर्धेमधील माध्यमिक मुलींचा व प्राथमिक मुलांचा खो-खो व कबड्डी प्रथम विजेता संघास मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले .याप्रसंगी मुलांना आनंद घेता यावा म्हणून फनी गेम्स ११ स्टॉल व खाऊचे चाळीस स्टॉल मांडण्यात आले होते. त्यातून व्यावहारिक अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाली. कलेला उत्तेजनासाठी ज्युनियर व सीनियर गटात रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
      व्ही. एस. नाईक व श्रीमती एम. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या. तब्बल ४० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ,लहान ग्रुप पाचवी ते सातवी
प्रथम क्रमांक -  कु.सृष्टी सुनील गिलबिले इयत्ता सहावी, द्वितीय क्रमांक- कु.तनिष्का अशोक चौगुले इयत्ता सातवी, तृतीय क्रमांक- कु. श्रुती बळवंत येलकर इयत्ता सातवी,मोठा ग्रुप इयत्ता आठवी ते नववी
प्रथम क्रमांक- कु.अवंती रामचंद्र तांबेकर इयत्ता आठवी, द्वितीय क्रमांक- कु.सिद्धी दीपक गोरे इयत्ता नववी, तृतीय क्रमांक कु. हर्षदा विजय इंगळे.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वैशाली पाटील यांनी समयोचीत शब्दात करून खरे प्रोत्साहन भरले "शब्दरूप शक्ती दे ,भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा" या जोशपूर्ण शब्दात त्यांनी प्रेरणा दिली. सौ भारती शिवणे यांनी पालकांच्या गौरवउद्गाराचा  उल्लेख करून आभार मानले. बी. बी. पाटील यांनी देखणी क्रीडांगण आखणी केली. जी. एन. भांदुगरे यांनी फलक सजावट केली. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयातून कार्यक्रम संपन्न झाला.



No comments:

Post a Comment