![]() |
सहभागी कवींना सन्मानपत्र देताना मान्यवर |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय आयोजित 'कविसंमेलन २०२३' ला नवोदित कवींचा मोठा प्रतिसाद लाभला. हे कविसंमेलन गाव मर्यादित आयोजित केले होते.
दीपप्रज्वलन नंतर नारायण गावडू पाटील यांनी स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले. नवोदित कवींनी पुढील प्रमाणे कविता सादर केल्या. इराप्पा अनंत पाटील (खरं सांग मामा यंदा तरी मुलगी देणार का?), अर्जून मुतकेकर (कन्या माझी), सागर बाजीराव पाटील (ताम्रपर्णी), तनश्री पाटील (दादा), संजीवनी बागिलगेकर (आई), दामिनी पाटील (मैत्री), समिक्षा मुंगूरकर (राजकारण), जयश्री जोशी (कोरोनाचा कहर), संजीवनी पाटील (मैत्री), प्रशांत कोकितकर (देव धर्म), कल्लापा पाटील (रोप), या कविता सादर केल्या. परगावी राहणारे कवी शिल्पा पाटील हिने (जीवन), योगिता पाटील (कवितेच्या ओळी), आशिष पाटील (वडील) यांनी आपल्या कविता व्हिडिओ कॉल द्वारे ऐकवल्या.
या कविसंमेलनात १४ कवींनी आपल्या बहारदार व आशयगर्भ कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्व कवींना सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व लेखणी देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए. के. पाटील होते. स्वागत के. जे. पाटील यांनी केले. प्रस्ताविक प्रा. व्ही. आर. पाटील यांनी केले. यावेळी श्रीकांत तारीहाळकर, झेविअर क्रुझ, गजानन पाटील, विलास शेटजी, विनायक पाटील, एस. एस. खवणेवाडकर, शिवाजी पाटील, अर्जून पाटील, मॅजिक शॉपी कोवाडचे मालक धनंजय पाटील आदींची उपस्थिती होती.श्रीकांत तारीहाळकर यांनी वाचनालयाला 'भगवदगीता' हा ग्रंथ भेट दिला. सुत्रसंचलन युवराज पाटील यांनी केले. पी एस कडोलकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment