रामलिंग हायस्कूल तुडये येथेआंतर शालेय विज्ञान प्रदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2023

रामलिंग हायस्कूल तुडये येथेआंतर शालेय विज्ञान प्रदर्शन

विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले विद्यार्थ्यी.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         रामलिंग हायस्कूल तुडये (ता. चंदगड) येथे आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य एस. जी. पाटील होते.

          या कार्यक्रमासाठी  केंद्रप्रमुख शामराव पाटील  तसेच ग्रामसेवक श्री. पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. संस्था अध्यक्ष महादेव मंगेश पाटील  यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तालुका  संघाचे संचालक बाळू चौगुले, परसू पाटील  हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या  विद्यार्थ्यानी या प्रदर्शनात सहभाग घेतला. प्रास्ताविक आर. डी. पाटील  यांनी केले. तसेच आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन घेण्याचा उद्देश विज्ञान शिक्षक आर. झेड. पाटील  यांनी स्पष्ट केला.  एस. जी. पाटील  यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment