बेळगाव येथे नौदल माजी सैनिक संघटनेतर्फे रविवारी नेव्ही डे - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2023

बेळगाव येथे नौदल माजी सैनिक संघटनेतर्फे रविवारी नेव्ही डे


कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

         बेळगाव, कॅम्प येथील मेसॉनिक हॉलमध्ये नौदल माजी सैनिक संघटनेतर्फे रविवारी  दि. आठ रोजी नेव्ही डे साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष व निवृत्त नौदल सेना अधिकारी अशोक पाटील (कालकुंद्री, सध्या रा. कंग्राळी) यांनी दिली. 

         सकाळी दहा वाजता सदर कार्यक्रम सुरू होणार असून संघटनेच्या सर्व सदस्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. संघटनेचे उपाध्यक्ष महावीर मजगावकर, सेक्रेटरी राजू साळुंखे यांच्या सह अन्य पदाधिकारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमादरम्यान श्वेता गावडे यांचा मनोरंजन कार्यक्रम होणार आहे. ४ डिसेंबर हा नौसेना दिन आहे, मात्र हा  संघटनेतर्फे रविवार दि. 8 रोजी सकाळी दहा वाजता हा दिन साजरा करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment