वंचिताना ज्ञानाचा प्रकाश दाखवणारी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले -प्रा. सरोजिनी दिवेकर, चंदगड महाविद्यालयात कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2023

वंचिताना ज्ञानाचा प्रकाश दाखवणारी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले -प्रा. सरोजिनी दिवेकर, चंदगड महाविद्यालयात कार्यक्रम

चंदगड महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य व प्राध्यापक 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         वंचिताना ज्ञानाचा प्रकाश दाखवणारी ज्ञानज्योती म्हणून सावित्रीमातेचे अमूल्य योगदान आहे असे प्रतिपादन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. सरोजिनी दिवेकर यांनी केले. त्या चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील खेडुत प्राध्यापक प्रबोधिनी, ताराराणी सखी मंच, जागर जाणिवांचा व इतिहास विभागाच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. 

        प्रा. सौ दिवेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, ``स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, बहुजन समाजाची उपेक्षा, शिक्षणाचा अभाव व समाजातील अंधश्रद्धा व रुढी परंपरेमुळे १९ व्या शतकात कोलाहल माजला होता अशा प्रतिकूल परिस्थितीत महिला वर्गाचे हक्क, सामाजिक न्याय, विषमतेच्या विरोधात आणि प्रस्थापितांच्या विरोधात त्यानी संघर्ष केला. आज प्रत्येक क्षेत्रात जी समाजाची प्रगती दिसते. ती या दम्पत्यांनी केलेल्या कार्यामुळेच होय. आज २१ व्या शतकात अज्ञान, अंधश्रद्धा, अनिए रूडी, प्रथा यांनी उच्छाद मांडला आहे. ते धावायचे असतील तर सावित्री मातेच्या विचारानेच आपणाला पुढे जावे लागेल आपण सर्वजण त्यांच्या विचारांचे अनुयायी बनणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी आर पाटील म्हणाले की, आधुनिक काळात शिक्षणाची खरी देवता सावित्री माताच आहे व्यवस्था बदलण्यासाठी आपणाला विचाराचे घाव सतत पालावे लागतील असे सांगितले..

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक खेडूत प्रबोधिनीचे प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. अंजली पाटील, डॉ. आर. ए. कमलाकर, सौ करुणा चंदगडकर प्रा. एस. के सावंत, प्रा. डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. डी. वाय कांबळे, डॉ एन. एस मासाळ, डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. एस. डी. गोरल व बहुसंख्य प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. टी. एम. पाटील यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment