यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी संचलित यश स्पोर्ट्स अकॅडमीचे घवघवीत यश - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2023

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी संचलित यश स्पोर्ट्स अकॅडमीचे घवघवीत यश


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

      हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय संचलित यश स्पोर्ट्स अकॅडमीचा विद्यार्थी  विक्रम अरुण पाटील (बीए भाग ३) याने कराड येथे झालेल्या स्पर्धेमध्ये ९७ किलो  ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल पटकावले व कु. बजरंग दीपक बिर्जे याची तामिळनाडू येथे होणाऱ्या  अखिल भारतीय आंतर विद्यापीठ होणाऱ्या ट्रिपल जंप लॉंग जंप मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.

       या यशाबद्दल दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ.बी.डी अजळकर प्रशासकीय प्रमुख प्रशांत शेंडे यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. के एम  गोनुगडे प्रा. एस डी तावदारे, प्रा. डॉ. आय आर जरळी प्रा. डॉ. आर ए घोरपडे प्रा.जी जे गावडे प्रा. जी पी कांबळे प्रा.जे.जे. व्हटकर ,जी.जी नाईक  सत्कार समारंभासाठी उपस्थित होते.क्रीडा शिक्षक डॉ. अर्जुन पिटूक यांचे मार्गदर्शन लाभले.No comments:

Post a Comment