चंदगड तालुका पंचक्रोशी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी करबंळकर सहकार पॅनेलचा दणदणीत विजय,१० जागावर विजय - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2023

चंदगड तालुका पंचक्रोशी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी करबंळकर सहकार पॅनेलचा दणदणीत विजय,१० जागावर विजय

चंदगड / मुंबई

चंदगड तालुका पंचक्रोशी को.ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कै.सटूप्पा रवळू करबंळकर सत्ताधारी पॅनेलने दहा पैकी दहा जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला विरोधी श्री.रवळनाथ परिवर्तन सहकार पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही.काल मुंबई येथील ना.म.जोशी मार्ग डिलाईड रोड,मुनिसिपल सेकंडरी शाळेत मतदान झाले.सायंकाळी ८वाजता निकाल जाहीर करण्यात आला.निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाकड्यांची आतिषबाजी करून विजय साजरा केला.

  चंदगड सोसायटीत एकूण अकरा जागेसाठी निवडणुकी लागली होती.त्यापैकी अनुसूचित जाती जमाती गटातून पाडुरंग रवळू कांबळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.उर्वरित दहा जागासठी दोन अपक्षांसह १४ उमेदवार रिंगणात होते.सत्ताधारी करबंळकर सहकार पॅनेलचे सर्वच उमेदवार हे २३०ते२६० मताच्या फरकाने विजयी झाले.दोन्हीही पॅनेलनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती.चंदगड तालुक्यातून नोकरी-व्यवसाया निमित्त मुंबईत आलेल्या तत्कालीन जाणकर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ५३ वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली होती. चंदगड तालुक्यातून मुंबईत येवून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अथवा खोली घेण्यासाठी या संस्थेतून कर्ज पूरवठा केला जातो.सध्या या संस्थेची कोट्यावधीची उलाढाल आहे.या संस्थेच्या सत्ताधाऱ्यांतच फूट पडली.विद्यमान संचालक दोन्ही गटात विभागले गेले.कै.सटूप्पा रवळू करबंळकर सत्ताधारी पॅनेल विरोधात श्री.रवळनाथ परिवर्तन सहकार पॅनेल अशी लढत झाली.यामध्ये करबंळकर पॅनेलने दहा पैकी दहा जागा जिंकत विरोधकांचे पानिपत केले.तीन अपक्षानीही या निवडणुकीत आपले नशिब आजमावले,पण त्याना चाळीसीही गाठता आली नाही.या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी  १४१०मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.त्यापैकी सरासरी ५० मते बाद झाली.

निवडणुक अधिकारी म्हणून सुनिल मरभळ यानी काम पाहीले.

कै.सटूप्पा रवळू करबंळकर सत्ताधारी पॅनेलचे विजयी उमेदवार व त्याना पडलेली मते सोमाना रवळू करबंळकर (७९६)नामदेव यशवंत घोळसे (७९८)चंद्रकात कृष्णा गावडे (७८५) दशरथ काळोजी हेंडोळे( ७५३)रावसाहेब गणपती रेडेकर( ७४८)नारायण महादेव सिताप(७५९)जितेंद्र शंकर गुरव( ७९९) सुभाष नाईक (८०३)

वर्षा राघोजी घाटकर ( ७७७) साधना महादेव घोटणे(७६१) पाडुरंग सटुप्पा कांबळे( बिनविरोध)

श्री.रवळनाथ परिवर्तन सहकार पॅनेल चे पराभूत उमेदवार  व पडलेली मते  बाळू वसंत अडसूळे(५३४) अशोक गावडु गावडे (५३४)संभाजी नागोजी गावडे (५४७)रविंद्र दत्तु हरेर (५४१) नारायण महादेव पाटील (५६७) सिताराम नारायण पाटील (५२९) गणेश यशवंत भुजबळ(५६९) विश्वनाथ सदानंद भेंकी (६६२)नम्रता सिताराम ढोकरे (५६३)दिव्या दिपक फाटक(५०६)

पराभूत अपक्ष उमेदवार धोंडीबा गणेश दळवी (३०)लक्ष्मण विठोबा कदम (९)प्रभावती केशव ढोकरे(७)विना सुधाकर कदम( ३८).No comments:

Post a Comment