मालवण येथे श्रीकांत पाटील यांचा सपत्नीक सन्मान करताना मान्यवर. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार तसेच कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्र, गोवा लोक गौरव सन्मान- २०२३' पुरस्काराने केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड चे मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड) यांना नुकतेच सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण 'कला नाट्य उत्सव मालवण- २०२३' बॅनर अंतर्गत मामा वरेकर नाट्यगृह मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील सरसेनापती हंबीरराव मोहिते फेम अभिनेते अनिल गवस, गोव्याचे सांस्कृतिक व ग्रामविकास मंत्री ना. गोविंद गावडे यांच्या हस्ते सगुण वेळीप संचालक सांस्कृतिक संचालनालय गोवा, प्रा. डॉ. बी. एन. खरात अध्यक्ष सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग, प्रेमेंद्र शेठ आमदार गोवा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. श्रीकांत पाटील हे उपक्रमशील, चतुरस्त्र व अष्टपैलू शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली. यापूर्वीही त्यांना तीन राज्य, राष्ट्रीय व अन्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment