मोदगे यात्रेसाठी कोवाड, बेळगाव व नेसरीतून चंदगड आगाराची बस सेवा - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2023

मोदगे यात्रेसाठी कोवाड, बेळगाव व नेसरीतून चंदगड आगाराची बस सेवाकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         मोदगे (मोहनगे) ता. हुक्केरी येथील भावेश्वरी देवीच्या यात्रेसाठी चंदगड आगाराने तीन ठिकाणाहून भाविकांसाठी एसटी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. अशी माहिती आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी दिली.

      दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविक या माघी यात्रेसाठी हजेरी लावतात. भाविकांच्या आग्रहास्तव आगाराने सालाबाद प्रमाणे यावर्षीही एसटी बसची सेवा उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुरू झाली असून मंगळवार या यात्रेच्या मुख्य दिवसाबरोबरच बुधवार दि. ८ रोजी भाविक प्रवाशांचा प्रतिसाद असेपर्यंत सुरू राहणार आहे.

       कोवाड येथून सुटणाऱ्या बस दुंडगे, चिंचणे, कामेवाडी, नरगट्टे ते घटप्रभा नदीपर्यंत जातील. नेसरी येथून सुटणाऱ्या बस कोवाड व्हाया वरील मार्गानेच धावतील. तर बेळगाव परिसरातून येणाऱ्या भाविकांसाठी बोगारवेस बेळगाव येथून सुटणाऱ्या बस उचगाव, होसूर, किटवाड,  कुदनूर राजगोळी मार्गे धावतील. या बस सेवेचा भाविकांनी भाविक प्रवाशांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment