लकी ड्रॉमध्ये जिंकली 'रॉयल इन्फिल्ड बुलेट' - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2023

लकी ड्रॉमध्ये जिंकली 'रॉयल इन्फिल्ड बुलेट'

 

राजा पंढरीचा इंटरप्राईजेस मार्फत इनफिल्ड बुलेट मोटरसायकल ग्राहकाला देताना प्रतिनिधी अमित चौगुले आदी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         राजा पंढरीचा एंटरप्राइजेस कंपनीच्या बकथॉर्न ज्यूस किंवा गॅस सेफ्टी पाईप खरेदीवर मिळणाऱ्या कुपन चा ३७ वा लकी ड्रॉ नुकताच काढण्यात आला. यात हसुरवाडी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील चंद्रकांत सुपले यांनी रॉयल एनफिल्ड बुलेट हे बंपर बक्षीस जिंकले. 

     मागील वर्षीच्या ड्रॉमध्ये बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथील एका ग्राहकाने मोटरकार बक्षीस जिंकले होते. ग्राहकांना बक्षीसा दाखल दूरदर्शन संच, लॅपटॉप, शिलाई मशीन, वॉटर प्युरिफायर, सिलिंग फॅन, मल्टीमीडिया साऊंड, गॅस शेगडी, सायकल इत्यादी वस्तू बक्षीस स्वरूपात दिल्या जातात. प्रत्येक ग्राहकाला किमान एक तरी बक्षीस दिले जाते. कंपनीचा पुढील ड्रॉ २४ मार्च २०२३ रोजी घेणार असल्याची माहिती संस्थेचे प्रतिनिधी अमित चौगुले यांनी सी. एल. (चंदगड लाईव्ह) न्यूजशी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment